in ,

चिंताजनक; सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या साडे तीन हजार पार

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी ठरतेय. कारण गेल्या सलग पाचव्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या ही साडे तीन हजार पार पोहोचली आहे. त्यामुळे अनलॉकमुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच आता खबदारीची गरज जनतेलाच घ्यावी लागणार आहे.

राज्यात आज 3663 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर आज नवीन 2700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत एकूण 19,81,408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.66% झाले आहे.

गेल्या 12 फेब्रुवारी रोजी राज्याची कोरोना रुग्णसंख्या ही 3670 होती. 13 फेब्रुवारीला हीच आकडेवारी 3611वर होती. 14 फेब्रुवारीला 4092 नवीन रुग्णसंख्या सापडली होती. 15 फेब्रुवारीला 3365 नवे रुग्ण सापडले होते. आणि आज 15 फेब्रुवारीला नवीन कोरोना रुग्ण 3663 होते. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या ही साडे तीन हजार पार पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी धक्कादायक माहिती आहे.

दरम्यान या वाढत्या नवीन कोरोना रुग्णांवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळले नाही तर कडक कारवाई करणार असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली. त्याचसोबत राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, पण नियमांची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर