in

जळगावमध्ये पित्याच्या हातून मुलाचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावमध्ये बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली आहे. बापाने रागात मुलाचाच खून केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुलगा दारू पिऊन घरी आला असताना शाब्दिक वाद विकोपाला जाऊन झालेल्या झटापटीत पित्याच्या हातून मुलाचा मृत्यू झाला.

सौरभ सुभाष वर्मा जळगावमधील बालाजीपेठ इथे राहत होता . सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा आणि सौरभ यांच्यात शाब्दिक वाद होऊन वाद विकोपाला गेला. सौरभने हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत असताना झालेल्या झटापटीत वडिलांच्या हातातून चाकू सौरभच्या पोटात खुपसला गेला आणि तो जखमी झाला.

तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले. घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले. वर्मा यांना ताब्यात घेतल्यानंतर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस महासंचालकांचे सखोल चौकशीचे आदेश

Ind Vs Eng : अश्विनच्या फिरकीपुढे फलंदाजांनी टाकली नांगी