in

टिकरी सीमेवर आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाइड नोटही लिहिली

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील टिकरी सीमेवर आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हा शेतकरी काही दिवसांपूर्वीच आंदोलनात सामील झाला होता. शनिवारी रात्री शेतकऱ्यानं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.

आत्महत्या केलेला शेतकरी जिंदच्या सिंहवाला येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. दरियाव सिंह असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते ५० वर्षांचे होते. टिकरी येथील एका बस स्टँडजवळील झाडाला प्लास्टिकच्या दोरीनं गळफास घेत दरियाव यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सुसाइड नोटमध्ये काय?

आत्महत्येपूर्वी दरियाव यांनी सुसाइड नोट लिहिली असल्याची माहिती समोर आली आहे. सुसाइड नोटमध्ये दरियाव यांनी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. ‘भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही. जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही’, असं या सुसाइड नोटमध्ये म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छत्रपती उदयनराजे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट

कृषी कायदे रद्द करा; राहुल गांधींचा पुनरुच्चार