in

Farmers Protest: ‘ही’ तीन राज्ये सोडून उद्या देशात होणार चक्का जाम आंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिकच तापतं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या ट्रॅक्टर रॅली नंतर आता शेतकऱ्यांनी उद्या (06 फेब्रुवारी) चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी देशातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यांतर्गत असलेले मार्गांवर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. दुपारी १२ ते ३ दरम्यान हे आंदोलन चालणार आहे. मात्र ह्या आंदोलनात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात चक्का जाम होणार नाही. सरकारने जर ऑक्टोबरपर्यंत हे कायदे मागे घेतले नाही तर, संपुर्ण देशात 40 लाख ट्रॅक्टरांची भव्य रॅली काढू, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला दिला आहे.

शनिवारी होणाऱ्या या चक्का जाममध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनही तयारी करत आहे. ‘जे लोक येथे येऊ शकले नाहीत, ते शनिवारी आपापल्या ठिकाणी राहून शांतपणे चक्का जाम करतील.’ तीन तास चालणाऱ्या या आंदोलनादरम्यान जे वाहतूक कोंडीत अडकतील, त्यांच्या जेवणाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याशिवाय, सरकार आमच्याबरोबर कसे वागत आहे, हे देखील त्यांच्यासमोर मांडू, अशी माहिती देखील भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, चक्का जामबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामधील पोलीस याबाबत अधिक गंभीर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG | पहिला दिवशी कर्णधार रूटचे दमदार शतक