in

Farmers Protest : आता लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या बाजूने ट्विट

लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरातून अनेक सेलिब्रिटी पाठिंबा देत ट्विट करत आहेत. त्यामुळे आता बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहरे सोशल मीडियावर या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करतायत. सचिन तेंडुलकर नंतर गाणकोकिळा लता मंगेशकर आणि भारतीय कॅप्टन विराट कोहली यांनी ही सरकारच्या बाजूने आपले मत व्यक्त केले आहे.

लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटलंय की, “भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असं सांगत त्यांनीही या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे.

त्याचसोबत भारतीय कॅप्टन विराट कोहलीनेही ट्विट केलं आहे. “मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, निलेश राणेंचा प्रहार

पानटपरी चालवून आजीनं नातवाला बनवलं सीए