in

Farmers Protest : हरयाणा जिल्ह्यांमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोबाइल इंटरनेट सेवा (2 जी / 3 जी / 4 जी / सीडीएमए / जीपीआरएस), बल्क एसएमएस सेवा आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर पुरविल्या जाणार्‍या सर्व डोंगल सेवा सोनीपत आणि झज्जर जिल्ह्यात बंद ठेवण्यात आली होती. या सेवा बंद ठेवण्याच्या कालावधीत उद्या सायंकाळी ५ पर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याचे हरयाणा सरकारने स्पष्ट केले आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे, केंद्र सरकारने आक्रमक पाऊलं उचलत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, पंजाब आणि हरयाणामध्येइंटरनेट बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मंदिरावर कर्णा म्हणजे स्पीकर लाऊन गावागातील शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचं काम केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

निवडणुका रद्द झालेल्या राज्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 12 मार्चला मतदान

महापालिका निवडणुकीत फक्त आश्वासन देणे, याला म्हणतात टाइमपास; मनसेचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर