गेले कित्येक महिन्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे मात्र आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन पूर्वीपेक्षा अधिक बळकट होत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या सीमेवर लंगर आणि तंबू रिकामे असूनही आंदोलनाला अधिक गर्दी होत असल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत. आंदोलनाला बळ देण्यासाठी गर्दी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे (पंजाब) अवतार सिंग मेहमा यांनी “गर्दी अजिबात कमी झालेली नाही. आम्ही फक्त पंजाब आणि हरियाणामध्येच नव्हे तर इतर राज्यातील खेड्यात आणि जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा वाढवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
पंजाबमध्ये लाट निर्माण करण्यास काही महिने लागले. तर देशात अशा प्रकारचे प्रभाव निर्माण होण्यास थोडा अधिक वेळ लागेल. पण आमच्या आंदोलनाचा वेग कमी झालेला नाही. आमच्या दृष्टीकोनातून हे आंदोलन दिवसेंदिवस मजबूत होत आहे” असं म्हटलं आहे. तसेच अनेक शेतकरी घरून परत येत आहेत. ते थोड्या काळासाठी घरी जातात आणि नंतर परत येतात. कारण त्यांना शेतीची कामेही सांभाळावी लागतात. तरीही सीमेवरील आंदोलकांची संख्या स्थिरच आहे” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Comments
Loading…