in

Farmers protest: शत्रुघ्न सिन्हांनी केंद्र सरकारवर डागली तोफ

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीमधील सदस्य हे कृषी कायद्याचे समर्थक असल्याने शेतकरी आंदोलकांचा समितीला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी एकामागोमाग एक ट्विट करत सरकारवर तोफ डागली आहे.

माननीय,हे काय सुरू आहे? आपण काय करत आहात ? सरकारने अहंकार दूर ठेवावा. लोहरीच्या शुभेच्छा देताना हे लक्षात आणून देत की आता कोणत्याही शासनाने आगीत खेळण्याची वेळ नाही. १३० कोटी जनतेतून निःपक्ष व्यक्ती पॅनलसाठी मिळाल्या नाहीत का?, असा सवालही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, नवीन समितीवर नेमण्यात आलेली मंडळी वादग्रस्त कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या या ट्विटमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, काँग्रेस नेते शशी थरूर, यशवंत सिन्हा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टॅग केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Gold-Silver Price| मकरसंक्रांतीला सोन्या-चांदीच्या भावात घसरण

लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्याला झाला कोरोनाचा संसर्ग