in

देशभरात चक्काजामला मोठा प्रतिसाद; शांततेत आंदोलन यशस्वी

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीच्या सीमेवर जवळपास ७० दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. याच पार्श्वभूमीर आज चक्काजाम पुकारण्यात आला होता. कृषी कायद्यांचा विरोध करत असलेल्या 40 शेतकरी संघटनांनी आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत देशभरात आंदोलन केले. राजस्थान-हरियाणादरम्यान शाहजहांपूर सीमेवर चक्काजाम करण्यात आला. पंजाबमध्ये अमृतसर आणि मोहालीमध्ये शेतकरी गाड्या रोखण्यासाठी रस्त्यांवर बसले होते. दुसरीकडे जम्मू-पठानकोट महामार्गावरही शेतकऱ्यांनी गाड्या रोखल्या होत्या. उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांना आंदोलनातून वगळण्यात आले.

शनिवारी चक्काजाम दरम्यान दिल्लीसह अनेक ठिकाणांवर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मात्र एकंदरीत आंदोलन शांततेत झाल्याचं पाहायला मिळालं.

कोणत्याही ठिकाणाहून तोडफोड किंवा हिंसेची घटना घडली नाही. चक्काजाम संपल्यानंतर भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी दबावाखाली सरकारसोबत चर्चा करणार नसल्याचे सांगितले. कायदा मागे घेण्यासाठी सरकारला 2 अक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. यानंतर संपूर्ण देशभरात चाळीस लाख शेकऱ्यांची रॅली निघणार असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी निघालेल्या शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्याच प्रमाणे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. या पार्श्वभूमीवर आज मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक दिवसांपासून यासाठी तयारी सुरू होती. ठिकठिकाणी बॅरिगेट्स आणि तारांचे कुंपण लावण्यात आले होते. अखेर आजचे चक्काजाम आंदोलन पार पडले आहे.

पंजाब – शेतकऱ्यांनी शाहजहानपूर सीमेजवळ राष्ट्रीय राजमार्गावर चक्का जाम केला.
जम्मू काश्मीर – शेतकरी संघटनांनी देशभर जम्मू-पठाणकोट हायवेवर चक्काजाम केला.
बंगळुरू – येलहंका पोलीस ठाण्याबाहेर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली – कृषी कायद्याविरोधात शहिदी पार्क येथे आंदोलन करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
तेलंगणा – हैद्राबाद लगतच्या महामार्गावर चक्काजाम करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच…पवारांचे संकेत

Corona Vaccination : 56 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस