दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला आता शंभरहून अधिक दिवस पूर्ण झाले. नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्यावर शेतकरी संघटना चक्का जाम करण्यात येणार आहे.
बुधवारी सिंघु सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीच 26 मार्चला भारत बंदची घोषणा करण्यात आली. भारत बंदची वेळ आणि स्वरूप आदी मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वाहतूक संघटनांशी 17 मार्चला बैठक होणार आहे. वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किमती, गॅसचे दर आणि खाजगीकरणाच्या विरोधात शेतकरी 15 मार्चला कामगार संघटनेसोबत रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात असल्याचे देखील किसान मोर्चाने सांगितले आहे. तसेच 28 मार्चला कृषी कायद्याच्या प्रती जाळण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील उन्हामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे सिंघु सीमेवर पक्के घरे बांधण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार आहे.
एकीकडे आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत असतानाच आता बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या निवडणुकांचंही बिगुल वाजलंय. आंदोलनानंही त्यानुसार आपली दिशा बदलायचं ठरवलंय. शिवाय ज्या राज्यांत निवडणुका होतायत तिथे जाऊन भाजपला मतदान करु नका असंही आवाहन शेतकरी नेते करणार आहेत.
Comments
Loading…