in

कृषी कायदे रद्द करा; राहुल गांधींचा पुनरुच्चार

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यात आवश्यक तो बदल करायला तयार असल्याचं केंद्र सरकार म्हणत आहे, तर बदल नको कृषी कायदेच रद्द करा, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल यांनी टि्वट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ‘शेतकऱ्यांचा आता गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प आहे. मोदी सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. हे यातून स्पष्ट होतं, असं सांगत मोदी सरकारनं अहंकार सोडावा. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि कृषी कायदे रद्द करावेत, असा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेससह इतर विरोधी पक्ष गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेऊन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी अनेक दिवसांपासून यांसदर्भात बोलताना दिसत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

टिकरी सीमेवर आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाइड नोटही लिहिली

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात