in ,

आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, ठाण्यात अँटिजेन टेस्ट बंधनकारक

वाजतगाजत आणि जयघोष करत विघ्नहर्त्या गणरायाचं काल स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली. आज दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. त्यासाठी ठाणे आणि मुंबई सज्ज झाली आहे.

दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार असल्याने मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात तर विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी 4 हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी 200 पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यात एक लाख 41 हजार 20 घरगुती तर 1 हजार 58 सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

ऑनलाईन बुकींग आणि विसर्जन

गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा. या लिंकवर www.ganeshvisarjan.covidthane.org जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट बुक करावे.

नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे आलेली क्यूआर कोड रिसिट डाऊनलोड करून ठेवावी तसेच कोडची प्रिंट अथवा मोबाईलमधील कोड विसर्जन स्थळी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून श्रींचे रीतसर विसर्जन करावे. या संबधी काही तांत्रिक अडचण असल्यास 9819170170 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सर्व गणेश भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठेकेदाराची एक चूक अन् शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान

At post umari taluka karanja Ghadge Dist wardha