in ,

Farah Khan | लसींचे दोन्ही डोस घेऊनही डान्स कोरिओग्राफरला कोरोनाची लागण…

बॉलिवूडमधील लोकप्रिय डान्स कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे लसींचे दोन्ही डोस घेऊनही तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फराह खान लवकरचं छोट्या पडद्यावर एका कॉमेडी शोमधून परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार होती. पण कोरोनाची लागण झाल्याने या शोचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

फराहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona report ) आल्याचे सांगितले. त्यामुळे फराह शूटिंग करत असलेल्या सेटवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही घेऊनही तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुण घेण्याचे आवाहन तिने केले आहे.

‘मी काळा टिका लावला नाही त्यामुळे असे झालं याचं मला आश्चर्य वाटतयं. मी कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले, तसंच कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांच्याच मी संपर्कात होते. मात्र तरीही मी कोरोनी पॉझिटिव्ह आले, मी ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले त्यांनी आपल्या कोरोना चाचणी करुन घ्या. आशा आहे मी लवकरं यातून बरी होईन.’ असं फराहने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Siddharth shukla| सिनेसृष्टीच्या कलाकारांनी केली हळहळ व्यक्त

Ambernath | चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी केली लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद