ऍमेझॉन प्राईमवरील फॅमिली मॅनचा दुसरा सीजन रद्द करण्यात अशा चर्चा आहेत. ही सीरीज 12 फेब्रुवारी रीजी ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार होती, परंतु ती अद्यापही रीलीज झाली नाही. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्समुळे ही सीरीज रद्द करण्यात आली आहे. ओतलेच माजी तर पाताल लोकच्या दुसर्या् सीजनवरही गंडांतर आले आहे.
ऍमेझॉन प्राईमवर मिर्झापूर 2 आणि तांडव या दोन सीरीज प्रदर्शित झाल्या होता. या दोन्ही वेबसीरीजमधील काही दृश्यांमुळे वाद निर्माण झाले होते. विशेषतः तांडवमधील दृश्यांमुळे निर्मात्यांना माफी मागितली होती.
अशा वेळी फॅमिली मॅनचा दुसरा सीजन येऊ घातला होता. पण नव्या गाईडलाईन्स आणि तांडवरून झालेल्या वादामुळे ही सीरीज प्रदर्शित न करण्याचा निर्णय ऍमेझॉनने घेतल्याचे वृत्त आहे.
परंतु मनोज वाजपेयी यांनी हे वृत्त फेटाळले आहे. यात कुठलेच तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे वृत्त खोटे असून तुम्हाला ही माहिती कोण पुरवतं असा सवाल मनोज वाजपेयीने विचारला आहे. तसेच अश प्रकारचे वृत्त प्रसारित करण्यापूर्वी दिग्दर्शकांचे मत जाणून घ्यावे अशी अपेक्षाही वाजपेयीने व्यक्त केली आहे.
असे असले तरी नव्या गाईडलाईन्समुळे फॅमिली मॅनचा दुसरा सीजन प्रदर्शित व्हायला वेळ लागत असल्याची कबुली निर्मात्यांनी दिली. सीरीजमध्ये कुठल्याही प्रकाराची काटछाट केली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. फॅमिली मॅनचा दुसरा सीजन मे किंवा जून मध्ये प्रदर्शित होईल असे म्हटले जाते.
Comments
Loading…