in ,

अन्वय नाईक प्रकरणी फडणवीसांचा गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना वाचवण्यासाठी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तत्कालीन सरकारने दाबल्याचा संशय कुटुंबीयांना आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसंच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपासही मुंबई पोलीस करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच आज विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण दाबले अस गृहमंत्री यांनी विधानसभेत म्हंटल. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाकेज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. तसेच त्यांनी आपल्या वक्तव्यात अन्वय नाईक यांची हत्या झाली अस वक्तव्य केले. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली आहे, त्यांची हत्या झाली नाही. हे वक्तव्य करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयन्त केला गेला. माझ्या हक्कापासून मला वंचित ठेवण्यासाठी जाणीव पूर्वक वक्तव्य केले आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

”मी स्वतः सुप्रीम कोर्टाचे म्हणणं वाचून दाखवलं होत तरीदेखील त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले, माझ्यावर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला हे विरोधात आहे. माझ्या हक्कावर गदा येत असल्याने मी कायद्याच्या अंतर्गत अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्क भंग दाखल केला आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

corona Negative : आलिया भट्टचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल