in

MPSC Exam Postponed : ‘विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण करू नका, निर्णय रद्द करा’

राज्यात येत्या रविवारी होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय जाहीर होताच, संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला असला तरी यावरून राजकीय स्तरावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या मार्च महिन्यात होणारी ही परीक्षा अवघे दोन दिवस असतानाच एमपीएससीने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. ती नंतर किती वाजता होईल, हेही अनिश्चित असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. पुणे, औंरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

तर, फडणवीस यांनी देखील ही परीक्षा ठरलेल्या दिवशीच घेण्याची मागणी करताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam Postponed : परीक्षा निर्धारित वेळेतच घेण्याची काँग्रेसची मागणी

लॉकडाऊन काळात शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य