in ,

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक, ‘या’ मंत्र्यांविरोधातही हक्कभंग

अँटिलिया स्फोटक प्रकरण, संचिन वाझे, मनसुख हिरेन, मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण अधिवेशनात आक्रमक होते. अधिवेशनाच्या आजच्या (10 मार्च) अखेरच्या दिवशी फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला. तर, मराठा आरक्षण उपसमितीचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातही त्यांनी हक्कभंगांचा प्रस्ताव दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी सभागृहात मराठा आरक्षणाबद्दल निवेदन सादर केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला आक्षेप घेतला. शोक चव्हाण यांचे निवेदन अतिशय दिशाभूल करणारे होते. महाराष्ट्रात एसईबीसीसंदर्भातील (सामाजिक व आर्थिक मागासवर्ग) कायदा हा 102व्या घटनादुरुस्तीच्या आधीचा आहे. आपण अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे त्यााला 102वी घटनादुरुस्ती लागू होत नाही. मात्र तरीही हा मुद्दा उपस्थित करून आमच्या काळात झालेला कायदा अडचणीत आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुकुल रोहतगी यांनी, 102वी घटनादुरुस्तीअन्वये सर्व राज्यांना नोटीस देण्यांची मागणी केली होती. त्यांना अॅटर्नी जनरल यांनी पाठिंबाही दिला होता. तरीही, यासंदर्भात चुकीची माहिती त्यांनी दिली, असा दावा फडणवीस यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीची यात्रा महोत्सव रद्द

10 दिवसांत विरोधकांनी केली सरकारची दोनदा कोंडी, ‘या’ दोन निर्णयामुळे ओढवली नामुष्की