in ,

“फडणवीस एक दिवस ‘मातोश्री’वरही येतील”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला असून फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्रं राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | २४ तासांत पुन्हा ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, तर १,३२,७८८ नव्या रुग्णांची वाढ

लहान मुलाला कोरोना होऊन गेला असेल तर २ आठवडे काळजी घ्या