in

फडणवीस-राज भेट; ठाकरेंच्या नव्या घरी फडणवीसांची सपत्निक भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच शीवतीर्थ या नव्या घरात राहायला गेले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे अनेक नेते राज यांच्या भेटी घेत आहेत. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता यांच्यासह राज यांच्या नव्या घरात पोहोचले. या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर क्रिकेटर सचिन तेंडुलकरनंही राज यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सलामान खान, आयुष शर्मा ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना

एसटीचं विलिनीकरण केल्यावर अनेक मंडळांचं विलिनीकरण करावं लागेल- शरद पवार