in

‘फडणवीसांना CDR मिळतो, मग आमच्याबाबतीत का नाही’; नाईक कुटुंब संतापलं

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

.अन्वय नाईक कुटुंबांतील या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून CDR दिला जातो. मग आमच्याबाबतीत तसा CDR का मिळाला नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या मुलीने केला. आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबानींना धमकी देणारा जैश-उल-हिंदचा टेलिग्राम ग्रुप तिहार जेल मध्ये बनविला?

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा