in ,

कोणाबरोबरही फोटो काढण्यासाठी फडणवीस उपलब्ध; खुद्द भाजपा नेतेच सांगतायत

लोकशाही न्यूज नेटवर्क

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत परभणीच्या जिंतूर येथे एक कार्यक्रमात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा फोटो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोविंद थिटे या सरकारच्या निर्णयामुळे तुरुंगातून जमिनीवर आलेला आहे. प्रत्येकाला वाटते नेत्यांसोबत फोटो काढावं, आणि त्यात गैर काही नाही, त्या भेटीचा मीडियात येणाऱ्या बातम्या हास्यास्पद आहे असं वक्तव्य मेघना बोर्डीकरांनी केला आहे.

गृहमंत्री यांचाही फोटो व्हायरल

राज्याचे गृह मंत्री यांचा एक फोटो चर्चेचा ठरला होता. या फोटोत गृहमंत्र्याचे शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाने 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे तर दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे तर अन्य एकावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती

आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही, RBI चा मोठा निर्णय