in

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा


मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ जून ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेत या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. त्याच प्रमाणे धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा महत्वाच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्टवर 10 ,11, 12 जून ला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीच्या डोसचे दर निश्चित

फडणवीसांच्या काळातील भरती राज्यपालांनी रोखली