in

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोटारसायकल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Share

बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकांना कर्ज द्या आणि मग कर्जावर घेतलेल्या मोटार सायकलवर बनावट नंबर प्लेट लावून विक्री करणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफास करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 50 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत कर्ज घेतल्यानंतर मोटारसायकल खरेदी करून एक व्यक्ती माहीम येथे मोटारसायकल विक्री करणार असल्याची गुप्त माहिती क्राइम ब्रँच -9 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. चौकशीनंतर पोलिसांना समजले की मुंबईतील काही लोक बनावट पॅनकार्ड, आधार कार्ड वापरुन बँकांकडून कर्जासाठी मोटारसायकली घेऊन जातात आणि नंतर मोटारसायकलची नंबर प्लेट बदलून ती कमी किंमतीला एखाद्याला विकतात. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी या रॅकेटमधून विक्री केलेली 50 मोटारसायकली जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांनी फुरकान अहमद शेख आणि रफिक वकार शेख यांना अटक केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘उद्योग बंद, बेरोजगारीत भर; तरीही मोदीजी गप्प का?’

अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता ‘चायनीज हँडसेट’ मोदी सरकारच्या रडारवर