in

भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

गुजरातमधील भरूच जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी यूपीएल-५ प्लांटमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागली. या आगीत २४ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

यूपीएल-५ प्लांटमध्ये मंगळवारी रात्री दोन वाजता स्फोट झाला. त्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सीएम नावाच्या प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोट इतका मोठा होती की त्याचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर परिसरातील गावांमध्ये भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि लोक घरातून बाहेर पडले.

या दुर्घटनेत २४ कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारांसाठी भरूच आणि बडोदामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाने कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण