लोकशाही न्यूज नेटवर्क
जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांना कोरोनाच्या लसीची प्रतिक्षा लागली होती. युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एक धक्कदायक घटना घडली आहे. .
फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्रकार लंडनमध्ये समोर आला आहे.
या आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव डेविड लॉन्गडन असं असून तो . डेविड साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये काम करत आहे. डेविडने स्वत: या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, आठ डिसेंबर रोजी फायजरच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
फायजरच्या लसीचा दुसरा डोस पाच जानेवारी देणं गरजेचं होतं मात्र सरकारने ऐनवेळी नियमांमध्ये बदल केला.
Comments
0 comments