in ,

कोरोनाचा उद्रेक; राज्यात नवीन रुग्णसंख्येचा आकडा 14 हजारानजीक

राज्यातील झपाट्याने कोरोना संसर्ग वाढत असून, दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज तब्बल 13 हजार 659 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य शासनासह, आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात एकूण 99 ह्जार 008 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 13 हजार 659 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.आज नवीन 9 हजार 913 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर मंगळवारी हाच आकडा 9 हजार 927 होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णसंख्येने मात्र काहीसा दिलासा दिला आहे. आतापर्यत एकूण 20 लाख 99 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डेलकर प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

अखेर अधिवेशन संपलं… यंदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात सहा विधेयके संमत