in

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

Share

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत सोशल मीडियावर दिली माहिती. मंत्री शिंदे म्हणाले, काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जम्मू-काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला; एका जवानाला वीरमरण

Lokshahi Impact; जेवणात सापडलेल्या अळी प्रकरणी दिले चौकशीचे आदेश