लोकशाही न्यूज नेटवर्क
इक्बाल मिर्ची प्रकरणात कॉंग्रेस नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. परिणामी त्यांना आता ईडी कार्यालयात हजेरी लावावीचं लागणार. याआधीही प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात बजावण्यात आला होता, मात्र पटेल ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे ईडीकडून आता पुन्हा समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं.
ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काहीजणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं.
काय होत इक्बाल मिर्चीची प्रकरण?
ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याच अंतर्गत ऑक्टोबर 2020मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची प्रचंड संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली होती.
याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.
Comments
Loading…