in

ED summons | शेतकऱ्यांचा गळा आवळणाऱ्यांना शिक्षा होणारच – आ. प्रताप अडसड

सुरज दाहाट, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमूख व उत्तरा जगताप यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे अमरावतीतील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मत भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केलंय.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी, माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावत तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला कोंडी झाली आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवीला होता.

या संदर्भात भाजप आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हा बँकेकडुन शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे ईडीच्या नोटीसमुळे पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँक चर्चेत आली आहे. त्यामुळे ज्यांनी शेतकऱ्यांचा गळा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवळला हे खरे सूत्रधार बाहेर येतील. त्याना शिक्षा होणारच आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मत भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डोंबिवलीतील भोपर देसलेपाडय़ात पाणी टंचाई

Mahad-Raigad