लोकशाही न्यूज नेटवर्क | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आज ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा छापा टाकला आहे. फेमा संबंधीच्या प्रकरणात त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर आज ईडी चौकशी करत आहेत.
फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीने छापा टाकला असून चौकशी सुरु केली आहे.
आयबीची परवानगी न घेता विदेशी बँकेत खोललेल्या खात्यात 500 कोटी कुठून आले याचा तपास ईडी करतेय. या प्रकरणी यापूर्वीही त्यांची दोन वेळा चौकशी झाली होती.
Comments
Loading…