in

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीधरन यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. श्रीधरन यांचं नाव केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. केरळ भाजपामधील स्थानिक नेतृत्वाला श्रीधरन हेच मुख्यमंत्रीपदी असावेत अशी इच्छा आहे, असंही आता बोललं जात आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. केरळ निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं यापूर्वीच श्रीधरन यांनी सांगितलं आहे. पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार असल्याचं श्रीधरन यांनी सांगितलं आहे.

केरळमध्ये भाजपला मोठ्या संख्येनं निवडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. पक्षाकडून सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यास मी नेहमी तयार असेल. मात्र, राज्यपाल होण्याची माझी इच्छा नाही. राज्यपालांचं पद पूर्णपणे घटनात्मक आहे. राज्यपालांना फारसे अधिकार नसतात, असं श्रीधरन म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘फडणवीसांना CDR मिळतो, मग आमच्याबाबतीत का नाही’; नाईक कुटुंब संतापलं

नागपूर शहरात संपूर्ण लॉकडाऊन – पालकमंत्री राऊत