in

Dussehra | समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी : Mohan Bhagwat

आज दसरा या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे नागपूरात आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी.व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो.  देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे.

यासोबतच ते म्हणाले की,  “देशाचं स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळालं. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. “कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. असेही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shiv Sena’s Dussehra Melava : Uddhav Thackeray काय बोलणार?

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी; देवीचे रूप पाहण्याकरिता भक्तांची गर्दी