in

डंपरची खासगी बसला धडक ; बसमधील १५ प्रवासी जखमी

Dumper hits private bus; 15 passengers injured in bus
Dumper hits private bus; 15 passengers injured in bus
Share

विरार पूर्वेकडील शिरसाड अंबाडी रोडवर डंपर व खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात खासगी बस मधील 15 प्रवाशी जखमी तर असून 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज सकाळी साडे आठच्या सुमारास हायवा डंपर हा अंबाडीच्या दिशेने भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत जात असताना गणेशपुरी कडून वसईच्या वालीव येथील कामगारांना घेवून बस निघाली होती. इतक्यात चांदीप – पारोळ दरम्यान डंपरने जोरदार धडक दिली.


या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून 1५ प्रवाशी किरकोळ जखमी झालेत. दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ मार लागला असून सर्व प्रवाशांना हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णवाहिकांना फोन करून सुद्धा एकही रुग्णवाहिका आली नाही. स्थानिक रिक्षा व खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती मात्र विरार पोलिसांनी क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

फक्त 10 वी पासवर मिळणार भारतीय टापाल खात्यात नोकरी…

Hundreds of fish die due to contaminated water; Five tons of fish thrown from Nagpur's Gandhisagar lakes

दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू ; नागपूरच्या गांधीसागर तलावांमधून फेकले पाच टन मासे