in

राज्यभरात आज ”वंचित” कडून डफली बजाओ आंदोलन

Share

केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली बजाओ आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.   

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्यात आली.बीड , परभणी , औरंगाबाद,  सातारा,  मनमाड,  अमरावती, मुंबई, ठाणे अशा अनेक भागात डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. 

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

You have come across a smartphone with abandoned features; Know the price and features

भन्नाट फीचर्स असलेला स्मार्टफोन आज मिळतोय स्वस्तात…

पंढरपुरात गॅसचा स्फोट, मोटारसायकल जळून खाक