in

क्रिकेटच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी सशर्त ड्रोनला परवानगी

लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकतीच IPLइंडियन प्रीमियर लीग २०२१ ची घोषणा करण्यात आली आहे. अशातच नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बीसीसीआयला थेट हवाई छायाचित्रणासाठी ड्रोन तैनात करायला सशर्त परवानगी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला बीसीसीआय व मेसर्स क्विडिक यांना थेट हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती.

नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे म्हणाले, “ड्रोन संकल्पना आपल्या देशात वेगाने विकसित होत आहे. सर्वच क्षेत्रात या संकल्पनेचा विस्तारत आहे. देशातील ड्रोनच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या उद्देशाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. ”ड्रोन नियम 2021 हे कायदा मंत्रालयाशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्यामध्ये ड्रोन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. ही नियमावली मार्च 2021 पर्यंत मंजूर होण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘गो कोरोना’ या घोषणेची राहील तुम्हाला साथ…कवी आठवलेंच्या गृहमंत्र्यांना शुभेच्छा!

क्रीडा कोट्यातून मिळणाऱ्या सरकारी नोकरीच्या यादीत २१ नव्या खेळांचा समावेश