in

मुंबईत ड्रायव्हरलेस मेट्रो

metro
मेट्रोचा प्रातिनिधिक फोटो
Share

मुंबईत चालकरहीत (ड्रायव्हरलेस) मेट्रोची चाचणी झाली. लवकरच दिल्ली प्रमाणेच मुंबईतही चालकरहीत मेट्रोसेवा सुरू होणार आहे. या सेवेसाठी भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या कंपनीने नव्या स्वदेशी मेट्रोची निर्मिती केली आहे. बंगळुरूतील कारखान्यात फक्त ७५ दिवसांत मुंबईसाठी पहिली चालकरहीत मेट्रो तयार झाली. भारत अर्थ मुव्हर्स मुंबईसाठी मेट्रोच्या ५०० डब्यांची निर्मिती करत आहेत. नव्या चालकरहीत मेट्रोमधून प्रवासी झटपट आणि सुरक्षितरित्या प्रवास करू शकणार आहेत. चालकरहीत मेट्रो गाड्या २५ केव्ही एसी ट्रॅक्शनवर काम करणार आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आठवडाभर जोरदार पाऊस पडणार

अमित शहांना कोरोना