in

डॉ. कांचन चाटे यांचा भाजपला जय श्रीराम

सुरेश वायभट | पैठण : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी डॉ. कांचन चाटे यांनी भाजपला जय श्रीराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत चाटे आपल्या समर्थकांसह उद्या पैठण येथे आयोजित कार्यक्रमात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ . चाटे यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम केले. भाजपच्या अनेक आंदोलनांत त्यांनी सहभाग नोंदविला. मात्र ते आता भाजपला जय श्रीराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पैठण येथे प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस माजीमंत्री अनिल पटेल , काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ . कल्याण काळे , तालुका अध्यक्ष विनोद तांबे , शहराध्यक्ष निमेश पटेल,युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर दसपुते यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. .

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा

शाहरुख खानची मॅनेजर एनसीबी कार्यालयात