in ,

राजस्थानात झाले आता महाराष्ट्रात लवकरच; राज्यातल्या मोठ्या नेत्याचा दावा

Share

एकिकडे कोरोनाचं सावट असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेसचे विश्वासू समजले जाणारे नेते सचीन पायलट यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदावरून कॉंग्रेसनेदेखील त्यांची हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळे सध्या ते भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या जोरदार चर्चादेखील होत आहेत. पायलट यांच्या या भुमिकेमुळे कॉंग्रेसमधून खदखद व्यक्त केली जात आहे, तर भाजपच्या अनेक नेत्यांची त्यांचं कौतुक केलं आहे.

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, मध्यप्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेसची सत्ता जाऊन तेथे भाजपची सत्ता स्थापन होईल. त्यानंतर महारष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आहे. असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या महाविकासआघाडीच्या सरकारबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

सचिन पायलट यांनी घेतलेल्या हा निर्णय स्वागतार्ह आहे. राजस्थानच्या विकासासाठी सचिन पायलट भाजपशी हातमिळवणी केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभे राहून राजस्थानचा विकास करावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Big decision of the Minister of Education regarding the final year examinations

मुंबई विद्यापीठात आज कोरोनाचा रुग्ण आढळला, आता तरी UGC ने विचार करावा…

आता शिवसेना नेत्याने दिली केतकी चितळेला धमकी…