in ,

कोरोनाचे संकटातच एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या

Share

नवी दिल्ली: कोरोनाचे संकट असताना एलपीजी सिलिंडरची किंमत सोमवारपासून वाढलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे भारतात एलपीजीच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो सिलिंडर ११.५० रुपयांनी महागलाय.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत याची किंमत ५८१.५० रुपये होती, जी आता प्रति सिलेंडर ५९३ रुपये इतकी झालीय. त्याचप्रमाणे कोलकातामध्येही आता याची किंमत ५८४.५० वरुन ६१६ रुपये झाली आहे. मुंबईत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर किमतीत ११.५० रुपयांची वाढ केलीय. ही दरवाढ 1 जून अर्थात आजपासून लागू झालीय.

Whatsapp वरून बुक करता येणार सिलिंडर:

भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड (BPCL) कंपनेने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 5 व्या लॉकडाऊनची तयारी सुरु असतानाचा कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. Whatsapp चा वापर करून आपण सिलिंडर घरबसल्या बुक करू शकता.

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकावरची पेट्रोलियम वितरण कंपनी म्हणून ओळख आहे. याशिवाय 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. मंगळवारपासून देशभरातील भारत गॅस (भारत गॅस) ग्राहक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करू शकता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Akshay Kumar: फेक बातमीवर अक्षय कुमार चिडला, म्हणाला- मी माझ्या बहिणीसाठी चार्टर्ड फ्लाईट…

मनावर दगड ठेऊन साहेबांचं दर्शन घेऊ शकत नाही – पंकजा मुंडे