in ,

काँग्रेसचे जोडे उचलणाऱ्या शिवसेना नेतृत्वाकडे मेंदू आहे का?; अतुल भातखळकर यांची टीका

लडाखमधील सैन्यांच्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होऊ लागला आहे. . चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला. याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे?,” असा प्रश्न शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला होता. त्यावर प्रत्युतर देताना, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी इटालियन काँग्रेसचे जोडे उचलणाऱ्या शिवसेना नेतृत्वाकडे मेंदू तरी आहे का? असा टोचक सवाल उपस्थित केला.

चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले? प्रश्न इतकाच आहे की, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही, विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत, असे जे गेले वर्षभर सरकारतर्फे सर्वच पातळ्यांवर सांगितले गेले, त्या सर्व थापाच होत्या असेच आता स्पष्ट झाले आहे. चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला. याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे?,” असा प्रश्न शिवसेनेने विचारला असताना , ”तपासण्यासाठी भाजपाकडे अनेक तल्लख मेंदू आहेत. पण मंद राहुल गांधींचा उदोउदो करणाऱ्या, इटालियन काँग्रेसचे जोडे उचलणाऱ्या शिवसेना नेतृत्वाकडे मेंदू तरी आहे का?” असे ट्वीवर अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Corona Update : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी