in

तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

राज्याती आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या तब्बल 281 मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी केली आहे. आता या मागणीला मुख्यमंत्री परवानगी देतात कि या डॉक्टरांचे प्रश्न सोडवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नुकताच स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणाने राज्य हळहळल आहे. त्यात आता आरोग्य विभागातील नैराश्य समोर आले आहे.10 महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आदिवासी मंत्र्यांकडील बैठकीत आदिवासी जिल्ह्यात काम करणाऱ्या भरारी पथकाच्या 281 डॉक्टरांचे मानधन 24 हजार रुपयांवरून वाढवून 40 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे रिकामी आहेत. दुर्गम आदिवासी जिल्ह्यात काम करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टर फिरकतही नाहीत तरीही दोन दशकांपासून हंगामी पद्धतीने काम करणाऱ्या आम्हा डॉक्टरांना सेवेत कायम करायला सरकार तयार नाही, असंही या भरारी पथकाच्या डॉक्टरांचे म्हणणं आहे.

स्वप्निल लोणकरसारखे आम्ही पुरते निराश असल्याची भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी दिलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर

Maharashtra Corona | राज्यात ८ हजार ४१८ नवे कोरोनाबाधित