in

दवाखाण्याची काच फोडल्याने डॉक्टर सोहेल शेख यांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार

कोरोना काळात अनेकवेळा डॉक्टरांवर हेल्ले झाल्याची घटना घडली. ह्या सर्व घटना थांबवण्यासाठी सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले असून, अशीच एक घटना भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत क्षेत्रातील रसुलाबाद या ठिकाणी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर सोहेल शेख यांच्या सर्वधर्मीय रुग्णांच्या सेवे बद्दल स्थानिक विघ्नसंतोषी युवकां कडून विरोध होत असून त्यांच्या दवाखाण्याची काच फोडल्याची घटना घडली आहे.

त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आहे तालुक्यातील कांबे, जुनांदुरखी, चिंबीपाडा या ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात मात्र त्यांच्या बद्दल स्थानिक युवकांमध्ये आकसाचे वातावरण असून ग्रामीण भागातील रुग्ण आल्यावर दवाखाना परिसरात जाणून-बुजून वाहन पार्किंग करून त्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रकार केला जात, असून या बाबत डॉक्टर सोहेल शेख यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान त्यासाठी या परिसरातील विघ्नसंतोषी युवकांवर कारवाई करून वातावरण पूर्ववत ठेवावे अशी मागणी डॉक्टर सोहेल शेख यांनी निजामपुर पोलिसांकडे केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोखंडी सळयांमधून गांजा तस्करी; पाच कोटीचा माल जप्त

मिळेल त्या लाकडा पासून विविध शिल्प बनविणारा औरंगाबाद मधील काष्ठ शिल्पांचा अवलिया जादूगार