in

राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या टिळकांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Do you know Tilak's 'these' things that influence national politics?
Do you know Tilak's 'these' things that influence national politics?
Share

प्रखर राष्ट्रभक्त, विद्वान, गणितज्ज्ञ, राजकीय तत्वज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार अशा अनेक उपाधी लोकमान्य टिळकांना लागू होतात. क्षेत्र कोणतंही असो; टिळकांचा त्या विषयावरचा अभ्यास कायमच दांडगा आहे. ब्रिटीशांविरोधात लोकांना एकजूट करणं त्यांची मूठ बांधणं शक्य करायचं असेल, तर त्यांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची संकल्पना मांडणारे आणि त्या संकल्पनेला साकार करणारे लोकमान्य टिळक आपल्या सगळ्यांना माहित आहेत.

भगवतगीतेचा अभ्यास करुन त्याला ‘गीता रहस्य’ या मराठी ग्रंथात रुपांतर करणारे टिळक, युवकांना व्यायामाचा मंत्र देणारे टिळक असा अदर्श टिळकांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. टिळकांचा जन्म हा रत्नागिरीतला. एक शिक्षक ते थोर क्रांतीकारी अशी टिळकांची ओळख आहे.

टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ अशी वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात टिळकांचा मोलाचा वाटा होता. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती’ उत्सवाची सुरूवातदेखील त्यांनी केली.

हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार घेणाऱ्या भारतीय असंतोषाचे जनक प्रख्यात ‘लाल बाल पाल’ या त्रैमुर्ती मधील एक म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचं नाव केशव मात्र बाळ गंगाधर टिळक अशीच टिळकांची कायम ओळख राहिली. लोकमान्यांची ओघवती भाषणं कायम स्मरणात राहावी अशीच आहेत. आज लोकमान्यांच्या देहावसानाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. अशा या महान क्रांतीकारकाला लोकशाहीचा मानाचा मुजरा.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rape incident in Bhayander, Police's failure to file a case

बलात्कार झालेली तरुणी गेली तक्रार नोंदवायला, पण पोलिसांनी केलं असं काही, की…

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन