in

तुमच्याकडे 2GB किंवा त्याच्यापेक्षा कमी रॅम असलेला फोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी

Testing of beta version of Android 11
Testing of beta version of Android 11
Share

देशात 4G वरून तंत्रज्ञान 5G कडे वाटचाल करत आहेत, तसच आता गुगलनेही आपली वाटचाल पुढे सरकवली आहे. गुगलने स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉंच केली आहे. ती म्हणजे सर्व Android धारकांच्या फोनमध्ये Android 11 चे बिटा व्हर्जन लवकरच येणार आहे, तशाप्रकारची टेस्टिंगदेखील गुगलने सुरू केली असून लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे. मात्र हे याचा त्याच धारकांना फायदा आहे, ज्यांच्या फोनमध्ये 2GB किंवा त्यापेक्षा जास्त रॅम आहे, त्याच स्मार्टफोन धारकांना Android 11 चा सपोर्ट मिळणार असल्याचंही गुगलकडून लिक झालेल्या एका पत्रात म्हटलं आहे.

अँड्रॉइड 11 ओएससाठी किमान 2जीबी रॅम असणं गरजेचं आहे, असं या पत्रात नमुद केलं आहे. त्यामुळे ज्यांच्या फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम असेल त्यांच्या फोनमध्ये हे Android 11 चं बिटा व्हर्जन अपडेट होणार नाही. त्या सर्व वापरकर्त्यांना ‘अँड्रॉइड गो’च्या सिस्टिमनुसारच काम करावं लागेल. फक्त इतक नाही, तर ज्यांच्या डिव्हाईसमध्ये 512 MB पेक्षा कमी रॅम आहे, त्या डिव्हाईसंना प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही इथून पुढे मिळणार नाही. म्हणजेच ज्यांच्या Android फोनमध्ये 512 MB पेक्षा कमी रॅम आहे, त्यांच्या फोनचा गुगल डिव्हाइस सपोर्ट बंद केला जाणार आहे. असंही त्या पत्रात म्हटलं आहे.

हे बदल 2020 वर्षाच्या अखेरीस पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या Android 11 च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंगदेखील सुरू आहे. ज्या प्रमाणाच गुगल आपल्या आयओएस सिस्टिममध्ये बदल करेल, त्याचबरोबर सर्व Android कंपन्यादेखील आपल्या Android व्हर्जनमध्ये अपडेट देण्यास सुरूवात करतील, त्याममुळे याचा फायदा तुम्हालाही घ्यायचा असेल, तर तुम्हालाही 2 GB पेक्षा जास्त रॅम असलेला Android स्मार्टफोन असणे, गरजेचे आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

यंदा कोकणात जाणाऱ्यांची वाट एकदम खड्ड्यातूनच

Mahapareshan is the first company in the country to use drones

वीजवाहिन्यांवर आता ड्रोनची नजर; ड्रोन वापरणारी ‘महापारेषण’ देशातील पहिली कंपनी