in

मृत्यूनंतर बाळासाहेबांना काय उत्तर देणार? – दिवाकर रावते

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. मराठी विद्यापीठाच्या विषयावरून रावते यांनी ठाकरे सरकारलाच प्रश्न केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्पात मराठी विद्यापीठासाठी विशेष तरतूद का केली नाही, असा सवाल रावते यांनी केला आहे.

‘मृत्यूनंतर वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटले आणि तू काय करून आलास असे विचारले तर मी काय उत्तर देऊ, असा उद्विग्न सवालही रावते यांनी केला आहे. आम्ही विधान परिषदेत आहोत. मात्र, बाळासाहेबांमुळे तुम्ही योग्द पदावर आहात, तरीही आदेश का देऊ शकत नाही, असा सवालही रावते यांनी उपस्थित केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलरची ट्रकला धडक

सावधान | उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढणार?