in

दिव्या अग्रवाल ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती

‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेतेपदावर अखेर दिव्या अग्रवालने आपलं नाव कोरलं आहे. दिव्या ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती ठरली आहे. या शोमध्ये विजेतेपद पटकावत दिव्याने ट्रॉफीसह २५ लाख रुपये रक्कम जिंकली आहे. तर या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली.

शोच्या पहिल्या दिवसापासूनच दिव्या अग्रवाल चांगलीच चर्चेत होती. शिमिता शेट्टी आणि दिव्या मधील वाद चांगलाच चर्चेत आला होता. तर या शोमध्ये कायम चर्चेत असलेल्या शिमिता शेट्टीला आणि निशांत भट्टला ‘बिग बॉस १५’साठी थेट तिकिट मिळालं आहे.

शनिवारी ‘बिग बॉस ओटीटी’चा फिनाले पार पडला. यावेळी रितेश देशमुख आणि जिनेलियाने खास हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांचे खास परफॉर्मन्सेसही पाहायला मिळाले. पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस’चा हा सिझन पार पडला होता. करण जोहरने हा संपूर्ण सिझन होस्ट केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

H1B व्हिसावरील ट्रम्प यांचा नियम रद्द झाला

“…हे संतापजनक आहे”,राजीनाम्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं सोनिया गांधी यांना पत्र