in

कोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न…

Share

गणपती उत्सव आणि कोकण हे अतूट नातं आहे. कितीही अडचणी, अडथळे निर्माण झाले तरी मुंबई पुणे येथील चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी घरी येणारच. कोरोना सारख्या माहामारीतदेखील हाच उत्साह असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसते, मात्र या उत्साहाला विघ्न लागले, ते म्हणजे खड्यांचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना खड्यांतून वाट काढत आपल्या गावी जावं लागणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या चार महिन्यांपासून ओस पडला होता मात्र आता गणेशोत्सवानिमित्ताने गजबजलेला आहे. कोकणात लवकर जाण्या-येण्यासाठी याच मार्गाचा पर्याय आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महामार्गावर रस्ता कुठे आहे? हे शोधावे लागते. चौपदरी करणाच्या नावाखाली वर्षानुवर्षे सुरू असलेले काम आणि त्यामुळे जागोजागी पडलेले खड्डे, यामुळे येथून प्रवास करणार्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नावाने लाखोली वाहत नागरिकांना हा प्रवास करावा लागतोच.

मुंबई- ठाणे येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांत जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठी रहदारी असते. मागील दहा वर्षांपासून चौपदरी करणाचे काम कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावर उन्हाळ्यात वाहतूक कोंडी ठरलेलीच असते, तर पावसाळ्यात रस्ता कुठे आहे? अशी परिस्थिती निर्माण होते. 160 किमी लांबीच्या महामार्गावर अपवादाने पाच दहा किमीचा रस्ता चांगला आहे. अन्य ठिकाणी प्रवास करताना अवघ्या दहा किमीच्या अंतरासाठी एक ते दिड तास मोजावा लागत आहे, त्यामुळे वाहनासोबतच वाहनात बसलेल्यांदेखील मरण यातना सहन कराव्या लागतात.

राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी अनेकदा दौरे करत पहाणीचा फार्स घातला कित्येकदा आंदोलने झाली, प्रत्येकवेळी आश्वासनांचा पाऊस पडला; पण परिस्थितीत काही केल्या बदल नाही. तरीही या रस्त्याची दुरूस्ती लवकरात लवकर केली जाईल, अशी आशा खासदार सुनील तटकरे यांना आहे.

पनवेलपासून खड्यांना सुरूवात होते ती कशेडीपर्यंत. कशेडीत आल्यावर धोका आहे तो दरड आणि महामार्ग खचण्याचा. तरीही चाकरमान्यांचा प्रवास सुरूच आहे, त्यामुळे किती जणांचे प्राण गेल्यावर सरकार जागे होणार, हेच पाहाणे आता गरजेचे असणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मरण्याआधीच घरच्यांनी खोदला वडीलांचा खड्डा

Sanjay Dutt has stage 4 cancer, not stage 3 cancer

अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर