in

Diesel Petrol Price Today | पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क | सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. आज पेट्रोलच्या दरातही 24 ते 25 पैशांची वाढ, तर डिझेलच्या दरात 30 ते 31 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ झाल्याने पेट्रोल-डिझलचे दर वाढत आहे. पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 31 पैशांची वाढ झालीय. दिल्लीत पेट्रोल 87.85 रुपये प्रतिलिटर, तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 94.36 रुपयांवर पोहोचले. त्याचबरोबर दिल्लीत आतापर्यंत डिझेलची किंमत 78.03 रुपये होती आणि मुंबईत प्रति लिटर 84.94 रुपये इतकी झाली आहे.

पेट्रोल- डिझेलचे दर

  • मुंबई : 94.36 रुपये प्रतिलिटर, डिझेल 84.94 रुपये प्रतिलिटर
  • नाशिक : 93.65 रुपये प्रतिलिटर, डिझेल 82.92 रुपये प्रतिलिटर
  • पुणे : 93.54 रुपये प्रतिलिटर, डिझेल 82.81 रुपये प्रतिलिटर
  • नागपूर 94 .33 रुपये प्रतिलिटर, डिझेल 84.91 रुपये प्रतिलिटर
  • दिल्ली 87.85 रुपये प्रति लिटर, डिझेल 78.03 रुपये प्रतिलिटर
  • कोलकाता 88.92 रुपये प्रति लिटर, डिझेल 81.31 रुपये रुपये प्रतिलिटर
  • चेन्नई : 89.96 रुपये प्रति लिटर, डिझेल 82.90 रुपये प्रतिलिटर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

यंदाचा माघी गणेशोत्सव कोरोनाची खबरदारी पाळूनच!