in

त्या रात्री मी पोलीस ठाण्यात गेलो होतो? कारण…

रेमडेसिविर पुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला सोडवण्यासाठी रात्रीच्या वेळी थेट पोलीस ठाण्यात गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांना सुनावले होते. फडणवीस सत्तेसाठी उतावीळ झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली होती.

‘पोलीस ठाण्यात जाण्याआधी मी पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त व उपायुक्तांना त्याबाबत माहिती दिली होती. लपूनछपून मी तिथं गेलो नव्हतो. तिथं आम्ही एफडीएची ऑर्डर संबंधितांना दाखवली. तोपर्यंत पोलिसांना एफडीएच्या ऑर्डरबद्दल काहीच माहिती नव्हती. इतकंच नव्हे तर, ब्रूक फार्माने इंजेक्शनच्या साठा केल्याची कुठलीही ठोस माहिती त्यांना मिळाली नव्हती. पुरावे असल्यास कारवाई जरूर करा, असं मी त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. ह्या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ फूटेज उपलब्ध आहे,’ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

What do you think?

-9 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘देर आए’….विजयी मिरवणुकांवर बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय