in

सोलापूर जिल्हा काँग्रेसवर धवलसिंह मोहिते पाटील, भाजपाला शह देण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली आहे. धवलसिंह हे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. धवलसिंहांना जिल्हाध्यक्ष करून काँग्रेसला भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह आणि धवलसिंह हे चुलते-पुतणे आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचा परिवार भाजपमध्ये तर धवलसिंह काँग्रेसमध्ये असल्याचे चित्र सध्या आहे. दोन्ही कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष याआधीही पाहायला मिळालाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Narayan Rane | नारायण राणे रत्नागिरीत, जनआशीर्वाद यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका; नैसर्गिक अधिवासात सोडले